हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशी प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला आणि एका फाईलवर आजच ही पाहिजे असा आग्रह धरल्याने अजित पवारांना उशीर झाला आणि त्यामुळेच ते गाडीने बारामतीला जाण्याऐवजी विमानाने गेले असं विधान रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोदराव हिंदुराव पाटील यांनी केलं. प्रफुल पटेल यांच्यामुळेच अजितदादांना विमानाने जावं लागले कि काय अशी चर्चा यानंतर राजकीय वर्तुळात रंगली. त्यानंतर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही यावर प्रतिक्रिया देत संशयाची सुई हि प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्याकडेच जात असल्याचं म्हंटल आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, मला जे काही तुमच्या दूरचित्रवाणीवरून आणि पेपर ला ज्या काही बातम्या आल्या त्याच्यावरून जी शेवटची फाईल दादांनी उशिरा परत केली, ती फाईल तिथं नव्हती. ती फाईल शोधायला वेळ झाला आणि त्याच्यामुळे दादाला वेळ झाला आणि त्या फाईलवर सही करूनच जा अशा पद्धतीचा आग्रह गोंदियाच्या राईस मिलच्या बद्दलचा त्यांचा होता. अशा पद्धतीच्या ज्या बातम्या येतात आहेत ते आता सत्य काय? त्याच्यातलं काय आहे ते चौकशी मध्येच पुढे येईल. आणि या निमित्तानं रोहित पवारांनी जी भूमिका मांडली की तिकडचे जे मोठे नेते आहेत, त्यांच्या आग्रहाने ते झालेलं आहे आणि म्हणून ते प्रफुल्ल पटेल यांच्यावर संशयाची सुई जाते आहे. म्हणून आम्ही हेच म्हणतोय की कोणी केलं नसेल, काय असेल ते वस्तुस्थिती पुढे यावी ही भूमिका आमची आहे.
दरम्यान, आज रोहित पवार यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आणखी एक खळबळजनक दावा केला. अजित पवार हे बारामतीला गाडीने जाण्याऐवजी विमानाने का गेले? याचा खुलासा करताना रोहित पवार यांनी अपघाताच्या आदल्या दिवशी म्हणजे २७ फेब्रुवारीला नेमकं काय घडलं? त्याचा संपूर्ण घटनाक्रमच सांगितला आहे. रोहित पवार म्हणाले, दादा जर 27 जानेवारी 2026 रोजी गाडीने पुणे आणि बारामतीला गेले असते तर हि अपघाताची दुर्दैवी घटना घडलीच नसती. 27 तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यावर मी अगोदरच बोलून दाखवल्या आहेत. बैठकीला उशीर झाला. त्यानंतर कुठला तरी फोन आला. तो फोन कोणाचा आला हे लोकांना आता कळालं आहे. फाईलवर मुद्दामहून तिथल्या तिथं सही झाली पाहिजे अशी एका नेत्याने फोनवर इच्छा व्यक्त केली. दादांनी ती स्वाक्षरी केली आणि संध्याकाळी 7.13 वाजता, विमानाचं बुकिंग झालं. जर दादांचा प्लॅन आधीच विमानाने जायचा असता तर आधीच बुकिंग झालं असत. किंवा 26 तारखेला संध्याकाळी झालं असत. जी काही क्रमवारी ती मी बोलून दाखवली. मी कुणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही. माझं प्रामाणिक मत आहे की लवकरात लवकर या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे. 27 तारेखापासून ते 28 तारखेपर्यंत चौकशी व्हायला पाहिजे.. तर जे प्रमुख पायलट होते. ते कुणाला भेटले. महिनाभर आणि दोन महिन्याभर कोणत्या हॉटेल ला भेटले? कुठे कुठे गेले होते ? कोणाला भेटले होते याची सु्द्धा चौकशी व्हायला हवी अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
ते पुढे म्हणाले, प्रमोदराव हिंदूराव यांनी जी माहिती दिली, याचा अर्थ मी कुठंही खोटं बोललो नाही हे समोर येत आहे. जसं की 27 तारखेला तटकरे यांनी स्वतः म्हणत आहेत कि मी तिथं स्वतः आलो, उशीरापर्यंत थांबलो. दुसर्या बाजूला हिंदुराव सांगत आहेत कि प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला आणि मग उशीरा झाला आणि दादा विमानाने गेले . याचा अर्थ तीनपैकी दोन गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे. एका पॉलिटिकल कन्स्लटन्शीबाबत तिथं चर्चा झाली. योगायोग असा आहे की या पॉलिटिकल कन्स्टलन्शीने विमान सुद्धा विकत घेतलं आहे. आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटींचा कॉन्ट्रक्ट कॅन्सल करण्यासाठी अजितदादांची भूमिका होती. कदाचित त्यामुळे तिथेच काही वाद विवाद झाला. सुनील तटकरे हे त्यावेळी तिथं होते. या वाद विवादामुळे दादांना उशीर झाला. उशीर झाला म्हणून दादा गाडीने जाण्याऐवजी विमानाने गेले असे रोहित पवार म्हणाले.