Ajit Pawar : अजित पवार जिवंत, ते परत येतील? शिंदेंच्या मंत्र्याने स्पष्टच सांगितलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाई नAjit Pawar। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर अफवांना सुद्धा उधाण आलं आहे. अजित पवारांच्या मृत्यूला १० दिवस उलटून गेले तरीही दादांचं असं अकाली जाणे अनेकांना सहन होईना, मनाला पटेना. त्यातच मागील काही दिवसांपासून अजित पवार जिवंत आहेत, दादा पुन्हा परत येणार आहेत अशा चर्चा सोशल मीडियावर पसरत आहेत. त्याप्रकारचे काही AI विडिओ सुद्धा व्हायरल झालेत. अजित पवार 21 ते 24 जानेवारीदरम्यान पुन्हा सर्वांसमोर येतील असे दावे अनेक सोशल मीडिया अकाऊंटवरुन केले जात आहेत. या सर्व अफवांवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी थेट भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर कधी काय येईल याचा काही भरोसा राहिलेला नाही. काय चर्चा घडते. कशाच्याबाबतीत घडते याचा काही नेम नाही असं संजय शिरसाट यांनी म्हंटल.


प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, खरं तर सोशल मीडियावर कधी काय येईल याचा काही भरोसा राहिलेला नाही. सोशल मीडियावर कशाच्या बाबतीत काय चर्चा घडतात याचा काहीच नेमकं नाही. मात्र अशा बातम्यांमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात गोंधळ निर्माण होतो. अजित पवारांच्या निधनाचा संपूर्ण खुलासा झाला आहे, त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. आता अजित पवारांचा पुतळा बसवण्याचं काम सुरु आहे, अशावेळी अशा प्रकारच्या बातम्या येतात तरी कुठून? झालेल्या दुर्देवी घटनेबद्दल अशा पद्धतीची वाच्यता करणं योग्य नाही असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं.


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून अजित पवारांच्या विमान अपघाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अजित पवारांच्या विमानात ६ लोक होती, पण ५ जणांचे मृतदेह सापडले, सहावा व्यक्ती कुठे आहे? असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला. तसेच सदर विमान कंपनीने डिसेंबर महिन्यातच सर्व कर्मचाऱ्यांचा ५० कोटींचा विमा काढला होता, मग त्यानंतरच एका महिन्यात अपघात कसा झाला? पायलट हाच आत्मघातकी बॉम्बर होता का? असा सवाल करत मिटकरी यांनी खळबळ उडवून दिली. त्यावरही संजय शिरसाट यांनी उत्तर दिले. तुम्हाला अजित पवारांच्या मृत्यूवर आक्षेप असेल तर तुम्ही तुमचा जबाब पोलिसांसमोर नोंदवला पाहिजे. पण रोज उठून बोलणं म्हणजे अजितदादांच्या जाण्याचं दु:ख कमी आणि राजकीय फायद्यासाठी बोलणं हे राजकारणासाठीही बरोबर नाही. तुम्हाला जागा दिली आहे. तिथे मांडा तुमचं मत असं संजय शिरसाट यांनी म्हंटल.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading