Ajit Pawar Last Call Recording : अजित पवारांचा शेवटचा कॉल रेकॉर्ड; विमानातूनच म्हणाले, आम्ही पण सर्व …..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ajit Pawar Last Call Recording : । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने महाराष्ट्र हळहळला आहे. अजित पवारांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रातील कामाचा माणूस हरपला आहे. अजूनही राज्यातील जनता तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या धक्क्यातून सावरले नाहीत. अजित पवारांच्या आठवणींना, त्यांच्या जुन्या रांगड्या भाषणांना उजाळा दिला जातोय. याच दरम्यान आता अजित पवारांचा निधनापूर्वीचे शेवटचे कॉल रेकॉर्डिंग समोर आले आहे. विमानातूनच अजित पवारांनी कॉल केला होता.

अजितदादांचा कोणाला कॉल ? Ajit Pawar Last Call Recording :

अजित पवार यांनी अपघाताच्या सहा मिनिटे आधी आपले चुलत पुतणे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांच्याशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत संवाद साधला होता. अजित पवारांचे विमान 8.46 ला कोसळले, परंतु त्यापूर्वीच 8 वाजून 37 मिनिटांनी अजित पवारांनी श्रीजीत पवार यांना कॉल केला होता. श्रीजीत पवार यांनी आज बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या शेवटच्या कॉलचे रेकॉर्डिंग ऐकवले. यावेळी अजित पवार फोनवर “आम्ही पण सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जातो बाळा! माळी समाजाला मी जिल्हापरिषदेची उमेदवारी दिलेली आहे,” असं सांगतात, तर दुसरीकडे श्रीजित पवार हे सुद्धा ठीक आहे दादा, तुम्हाला जे योग्य वाटते ते निर्णय घ्या असं म्हणतात. म्हणजेच काय तर शेवटच्या क्षणीही सर्व जाती धर्माना सोबत घेऊनच राजकारण करण्याचा अजित पवारांचा मानस हा कायम दिसला.

काय आहे अजित पवारांच्या शेवटच्या कॉल मध्ये ?

अजित पवार– आम्ही पण सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जातो.

श्रीजीत पवार- मला जे वाटलं ते मत मी मांडलं दादा.

अजित पवार– अहो, बरोबर आहे. पण मी माळी समाजाला जिल्हा परिषदेची उमेदवारी सुपे गटातून दिली आहे. ती जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होती. असं असतानाही इतर पक्षांनी वेगळे उमेदवार दिले. मात्र त्या पद्धतीने आपण केलं आहे.

श्रीजीत पवार– ठीक आहे दादा, तुम्हाला जो योग्य वाटतो, तो निर्णय घ्या.

अजित पवार- ओके.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading