Ajit Pawar Plane Accident : विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न; अजितदादांच्या अपघातात नवा ट्विस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ajit Pawar Plane Accident अजित पवारांचे विमान अपघातातील निधन हे अजूनही गूढ आहे. बारामतीमध्ये लँडिंग करताना विमान कोसळलं असं सुरुवातीला बोललं गेलं, मात्र त्यानंतर काही तासांत समोर आलेल्या सीसीटीव्ही नुसार, विमान हवेत असतानाच अचानक पलटले होते हे स्पष्ट झालं. त्यानंतर विमानात ६ प्रवासी असताना ५ जणांची बॉडी कशी काय सापडली? अजितदादा विमानतळावर बसतानाचा सीसीटीव्ही कुठं आहे? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात अजूनही घर करून गेलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी हे सुद्धा सातत्याने या प्रश्नांवर आवाज उठवताना दिसतायत. त्यातच आज अमोल मिटकरी यांनी आणखी एक धक्कादायक दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, ज्याठिकाणी विमान क्रॅश झालं त्याठिकाणी मी त्याच दिवशी संध्याकाळी गेलो होतो. त्यावेळी मला तेथील सरपंचानी सांगितलं कि विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न होते, त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानक स्फोट झाला. तो व्यक्ती नेमका कोण होता? विमानातील सहाव्या प्रवाशाची बॉडी असून सापडलेली नाही तो हाच प्रवासी आहे का? असेही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सुद्धा नेटकऱ्यानी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक सवाल उपस्थित केलेत ज्याची उत्तरे अजून सापडली नाहीत.

अजित पवार यांच्या मृत्यूचं गूढ महाराष्ट्रासमोर राहू नये, त्याचा संपूर्ण उलगडा व्हावा यासाठी आपण जिवंत असेपर्यंत लढा देणार असल्याचे अमोल मिटकरी यांनी यावेळी सांगितले. तसेच जर अजित पवार यांचा घातपात झाला असेल, तर त्याचा बदला घेणं ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचंही ते म्हणाले. अजित पवारांबद्दल कोणी अपशब्द वापरले असतील, तर त्याला त्याच ताकदीने उत्तर देण्यात येईल. आम्ही परिणामांची चिंता करणार नाही असं म्हणत अमोल मिटकरी यांनी आक्रमकपणा दाखवला.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading