Ajit Pawar Plane Accident : अजित पवारांच्या विमानाचा अपघात!!! बारामतीत घडली घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज अपघात झाला आहे. बारामतीत लँडिंग करत असताना हा गंभीर विमान अपघात झाला आहे. विमानात अजित पवार आणि त्यांचे सुरक्षा रक्षक असल्याचे बोललं जात आहे. या अपघातामध्ये अजित पवार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाचा ताबा सुटल्याने विमानाला भीषण अपघात झाला. नेमका हा अपघात कशामुळे झाला आहे आणि कोण जखमी झालेत याची माहिती थोड्यावेळात समोर येईल असं सांगितलं जात आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading