हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं आहे. आज सकाळी बारामतीत लँडिंग दरम्यान हा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील हि सर्वात मोठी दुःखद घटना म्हणावी लागेल. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाचा ताबा सुटल्याने विमानाला भीषण अपघात झाला. नेमका हा अपघात कशामुळे झाला आहे आणि कोण जखमी झालेत याबाबत एका प्रत्यक्षदर्शींनी थरार सांगितलं आहे.
नेमका अपघात कसा झाला?
प्रत्ययक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान खाली येत होतं तेंव्हा हे क्रॅश होणार हे समजत होतं. आधी वाटलं कि धावपट्टीवर विमान उतरत आहे. पण विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. आग एवढी मोठी होती की कोणालाच वाचवणं शक्य नव्हतं. विमान चालकानेही विमान ट्रॅकवर उतरवण्याचा प्रयत्न केला असणार पण धावपट्टीवर येण्याच्या 100 फूट आधी विमान क्रश झालं आणि अजित पवारांसह विमानातील सर्वच्या सर्व ६ जणांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेनं महाराष्ट्र हळहळला आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा काळा दिवस ठरला आहे.
विमानात कोण कोण होते? (Ajit Pawar Dead Baramati Plane Crash)
अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक
दरम्यान या अपघाताचं वृत्त समजताच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सर्व राजकीय दौरे रद्द केले असून सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार दिल्लीहून बारामतीच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती आहे.