Ajit Pawar Plane Crash CCTV Video : विमान अपघाताचे CCTV फुटेज समोर; बघून तुमच्याही काळजाचं पाणी होईल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ajit Pawar Plane Crash CCTV Video । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं आहे. आज सकाळी बारामतीत लँडिंग दरम्यान हा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. दादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांचा अपघात हा खरच अपघात होता कि यामागे घातपाताची शक्यता आहे? अशा चर्चा सुरु झाल्या. याच दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. हा विडिओ पाहून तुमच्या अंगाचा थरकाप उडेल.

काय आहे CCTV मध्ये ? Ajit Pawar Plane Crash CCTV Video

धावपट्टीजवळ लावलेल्या कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही मध्ये तुम्ही पाहू शकता कि, विमान वेगाने खाली उतरताना दिसत आहे, त्यानंतर ते जमिनीवर आदळते आणि आगीच्या लोळात पेट घेते, त्यानंतर अनेक स्फोट होतात . अपघातस्थळी काळ्या धुराचे लोट पसरल्याचे दिसत आहे. विमानाच्या अवशेषांच्या दृश्यांमध्ये धावपट्टीच्या बाहेर लियरजेटच्या धडाचे विखुरलेले तुकडे आणि भाग दिसत आहेत. अतिशय भीषण असा हा अपघात होता. ज्यामध्ये अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, प्रत्ययक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान खाली येत होतं तेंव्हा हे क्रॅश होणार हे समजत होतं. आधी वाटलं कि धावपट्टीवर विमान उतरत आहे. पण विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. आग एवढी मोठी होती की कोणालाच वाचवणं शक्य नव्हतं. विमान चालकानेही विमान ट्रॅकवर उतरवण्याचा प्रयत्न केला असणार पण धावपट्टीवर येण्याच्या 100 फूट आधी विमान क्रश झालं आणि अजित पवारांसह विमानातील सर्वच्या सर्व ६ जणांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेनं महाराष्ट्र हळहळला आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा काळा दिवस ठरला आहे.

विमानात कोण कोण होते? (Ajit Pawar Dead Baramati Plane Crash)

अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading