हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ajit Pawar Plane Crash । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामतीत विमानाचे लँडिंग होण्यापूर्वीच विमान कोसळले आणि मोठा स्फोट झाला. या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवारांच्या अपघातावर अनेकांनी शंका व्यक्त केल्या. हा अपघात आहे कि घातपात आहे? विमानात ६ प्रवासी होते तर ५ लोकांचाच मृतदेह कसा सापडला? विमान नेमकं कशामुळे पडले? असे एक ना अनेक सवाल सर्वसामान्यांच्या मनात घर करून केले. त्यानंतर डीजीसीएने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले. आता, या चौकशीतील प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
काय आहे अहवालात
प्राथमिक अहवालात विमानातील तांत्रिक बिघाड आणि वैमानिकाचा चुकलेला अंदाज ही दोन प्रमुख कारणे असल्याचे समोर येत आहे. विमान लँडिंगच्या स्थितीत असताना त्याच्या नियंत्रण सिस्टीम मध्ये किंवा इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या बिघाडामुळे शेवटच्या क्षणी विमानाने संतुलन गमावले. इंजिनमधील बिघाडामुळे वैमानिकाला विमानावर नियंत्रण मिळवता आले नसल्याचं बोललं जात आहे. धावपट्टीच्या दिशेने जात असताना विमानात निर्माण झालेली अस्थिरता अपघाताचे कारण ठरले.
वैमानिकाचा अंदाज चुकला –
वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज आला नाही. तांत्रिक अडचणींमुळे विमान उतरवत असताना अँगल’ चुकला. पहिल्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे न उतरल्याने ‘वैमानिकाने पुन्हा एक राऊंड मारून दुसऱ्यांदा विमान उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, याच दरम्यान विमानाचे नियंत्रण तुटले आणि आणि ते खाली कोसळले असा अंदाज बांधला जात आहे. विमानाचे पायलट सुमित कपूर आणि को-पायलट शांभवी पायलट होते. कॅप्टन सुमित कपूर हे अनुभवी पायलट होते, मात्र तरीही मी विमान दुर्घटना घडली.