हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ajit Pawar Plane Crash | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ अद्यापही कायम आहे. अजित पवारांचा विमान अपघात हा खरंच अपघात आहे की यामागे घातपाताची शक्यता आहे अशी शंका सुद्धा राजकीय वर्तळातून व्यक्त करण्यात येतेय. त्यात अजित पवारांचे पुतणे आणि कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आघाडीवर आहेत. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी खळबळजनक आरोप केला. अजित दादांचे विमान मुद्दामहून खाली पाडण्यात आले असे म्हणत रोहित पवार यांनी थेट वैमानिकावर आरोप केला आहे.
मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, मुंबईवरुन बारामतीला जाण्यासाठी जास्त इंधनाची गरज नव्हती. तरीही मुंबईवरुन हे विमान जात असताना इंधन पूर्णपणे भरलं होतं. विमानाच्या पंखातील इंधनाच्या टाक्या पूर्णपणे फुल करण्यात आल्या होत्या. बारामतीला दादांना सोडल्यावर विमान पुढे जाणार होतं, मग पुढे हैद्राबादला जाऊन विमानात इंध भरता आलं असतं ना. कोणी असं म्हणेल की महाराष्ट्रात इंधन स्वस्त असतं, म्हणून भरलं असेल तर मह इथल्यापेक्षा गुजरातमध्ये त्याहीपेक्षा स्वस्त होतं परंतु जास्ती इंधनाचा वापर हा मुद्दामहून करण्यात आला होता का ??असा आरोप रोहित पवार यांनी केला.
ज्यावेळी अजित पवार मुंबईहून बारामतीसाठी निघाले त्यावेळी विमानात 3000 ते 3500 लीटर इंधन होते. इतकंच नाही तर विमानाच्या टॉयलेटजवळ इंधनाचे अतिरिक्त कॅनही ठेवले होते. या सगळ्यात पायलटचा वापर करुन अजित पवार यांच्या विमानाचा अपघात घडवण्यात आला, असे आम्हाला वाटते अशी शंका रोहित पवार यांनी व्यक्त केली. यामागच कारण म्हणजे विमानात जास्ती प्रमाणात इंधन असेल तर स्पोर्ट होण्याची शक्यता जास्त असते असे आम्हाला वाटते.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी दृश्यमानता कमी असूनही पायलट सुमित कपूर यांनी आणखी एक राऊंड मारला आणि विमानाचे लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यांनी मुद्दाम विमान खाली आदळले आणि स्फोट घडवून आणला, असा आरोप करत रोहित पवार यांनी संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली.
VSR कंपनीवर कारवाई का नाही??
सरकारने VSR कंपनीवर कारवाई का केली नाही हा सवालही रोहित पवार यांनी केला. काही लोकं व्हीएसआर कंपनीला वाचवायचा प्रयत्न करत आहेत. सत्तेतील लोक मुद्दाम मालकाला वाचवत आहेत असा आरोप रोहित पवार यांनी केला.