हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ajit Pawar Plane Crash । भाजपाचे लोक काय करतील, याचा भरोसा राहिला नाही. अजित पवार यांचा मृत्यू रहस्यमय आहे, ते रहस्य आम्हाला जाणून घ्यायचं आहे. ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून अजितदादांचं बरं- वाईट तर झालं नाही ना? असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे . अजित पवारांच्या निधनाने आजही महाराष्ट्र दुःखात असून या अपघाताची निष्पक्ष चाैकशी झाली पाहिजे अशी मागणीही संजय राऊत यांनी केली .
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, मागील काही दिवसापासून अजित पवार भाजपाच्या भ्रष्टाचारावर सातत्याने बोलत होते. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपने कुत्र्यांच्या नसबंदीत कसे पैसे खाल्ले हे अजित पवार यांनी जाहीर सभेतच सांगितलं होते. ते अनेक वर्ष अर्थमंत्री असल्याने भाजपाच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांना सर्व माहिती होती. ते सर्व कागदपत्रे आपल्याजवळच ठेवत. अशावेळी त्यांच्या या अचानक झालेल्या अपघाताचे आणि मृत्यूचे रहस्य लोकांना समजले पाहिजे. अजित पवार जर भाजपा सोडून परत शरद पवारांकडे गेले असते तर तो भाजपाच्या ऑपरेशन लोट्सला मोठा धक्का बसला असता. जो भारतीय जनता पक्षाचा विरोधात जाईल तो एक तर जेलमध्ये जाईल किंवा त्याचा जीव जाईल, अशी परिस्थिती आहे असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
नक्कीच काहीतरी गडबड – भुजबळ
दरम्यान, अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनीही आता अजित पवारांच्या अपघातामागे घातपाताची शक्यता वर्तवली आहे. देशात अनेक विमान अपघात झाले. परंतु अशाप्रकारचा अपघात पहिल्यांदा झाला. जेव्हा मी पार्थला भेटलो तेव्हा त्याच्याकडे एक सीसीटीव्ही फुटेज होते. त्यात ते विमान एकदा घिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्यावेळी सरळ असणारे विमान अचानक पलटी मारल्यासारखे दिसते. त्यानंतर काही क्षणात होत्याचे नव्हते झालं. या प्रकरणाची चौकशी तर होईलच, परंतु मी अनेकांशी बोलतोय. त्यात कुठेतरी काही गडबड झालीये, इंजिनमध्ये किंवा रडारमध्ये, त्याची माहितीही येईल. पण जी सोन्यासारखी माणसे गेली ती कशी काय परत येतील असं छगन भुजबळ यांनी म्हंटल.