हॅलो महाराष्ट्र ऑनलाईनAjit Pawar Plane Crash । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आजही प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत. अजित पवारांचा विमान हा अपघात नसून घातपात आहे असा आरोप मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार करत आहेत. याबाबत रोहित पवारांनी तब्बल ३ ते ४ वेळा पत्रकार परिषद घेत अनेक पुरावेहीची सादर केले. तसेच याबाबत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. रोहित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्याने अजित पवारांचा मर्डर झालाय अशी खळबळजनक पोस्ट शेअर करत राजकीय वर्तुळात धुरळा उडवून दिला आहे.
शासनाची व चौकशी करणाऱ्या यंत्रणांची भूमिका पाहता आदरणीय अजितदादांचा सुनियोजित मर्डर झालेला आहे यावर माझे ठाम मत बनलेले आहे. सदर प्रकरण दडपण्याचा उच्च पातळीवरून प्रयत्न सुरू आहे.
— Vikas Lawande (@VikasLawande1) March 4, 2026
कारण अजितदादा हे कुणाचा तरी मोठा राजकीय अडथळा बनलेले असावेत.
इतिहास तपासला तर अनेक प्रकरणे दडपली आहेत…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता आणि संघटक सचिव विकास लवांडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य वेधलं आहे.शासनाची व चौकशी करणाऱ्या यंत्रणांची भूमिका पाहता आदरणीय अजितदादांचा सुनियोजित मर्डर झालेला आहे (Ajit Pawar Plane Crash) यावर माझे ठाम मत बनलेले आहे. सदर प्रकरण दडपण्याचा उच्च पातळीवरून प्रयत्न सुरू आहे.कारण अजितदादा हे कुणाचा तरी मोठा राजकीय अडथळा बनलेले असावेत.इतिहास तपासला तर अनेक प्रकरणे दडपली आहेत हे लक्षात येईल अशी पोस्ट विकास लवांडे यांनी शेअर केली आहे. विकास लवांडे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता सत्ताधारी गटातील नेते काय म्हणतात ते पाहायला हवं.
अजित पवार अपघात प्राथमिक अहवाल काय?
दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत (Ajit Pawar Plane Crash) काही दिवसांपूर्वी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, खराब हवामानामुळे हा अपघात घडल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. २२ पानांच्या या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, बारामती विमानतळावर उतरण्यापूर्वी वैमानिकांनी दृश्यमानतेबाबत नियंत्रण कक्षाकडे माहिती विचारली होती. त्यावेळी नियंत्रण कक्षाकडून दृश्यमानता सुमारे ३००० मीटर असल्याचे सांगण्यात आले. तसेच लँडिंगसाठी परवानगी देताना हवामान सामान्य असल्याचेही कळवण्यात आले होते.मात्र, व्हिज्युअल फ्लाइट रूल्स (VFR) अंतर्गत उड्डाण करणाऱ्या विमानासाठी आवश्यक असलेली दृश्यमानता प्रत्यक्षात प्रमाणापेक्षा कमी होती, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. विमान धावपट्टी क्रमांक ११ वर उतरवण्याचा प्रयत्न करत असताना, त्याचे नियंत्रण सुटले आणि ते धावपट्टीच्या डाव्या बाजूला जाऊन आदळले. विशेष म्हणजे, जमिनीवर आदळण्यापूर्वी हे विमान धावपट्टीलगत असलेल्या उतारावरील झाडांवर धडकले, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.