Praful Patel- Sunil Tatkare : प्रफुल्ल पटेल-तटकरे नालायक माणसे, नीच अन् कपटी; ठाकरेंच्या शिलेदाराने सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला साधे ३ दिवस सुद्धा झाले नाहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार याना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. राज्यात एकनाथ शिंदेंच्या रूपात एक उपमुख्यमंत्री असताना आणि सरकारकडे बहुमत असतानाही सुनेत्रा पवारांच्या शपथविधीसाठी का आणि कशासाठी घाई करण्यात आली? यावरून फक्त राजकीय वर्तुळातच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूसही चर्चा करू लागला. या सर्व घडामोडीत प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे तसेच धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हि चौकडी आघाडीवर दिसत होती. अजूनही सोशल मीडियावर या चौघांविरोधात नाराजीचा सूर सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे माजी आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी फेसबुक पोस्ट करत तटकरे आणि प्रफुल पटेल (Praful Patel- Sunil Tatkare) यांच्या वर टीकेची झोड उठवली आहे. प्रफुल्ल पटेल-तटकरे नालायक, नीच अन् कपटी माणसे आहेत असं म्हणत अंबादास दानवे यांनी खडेबोल सुनावलं आहेत.

काय म्हणाले अंबादास दानवे?

मेलेल्या माणसांच्या टाळूवर लोणी खाणं
महाराष्ट्रात कधीपासून संस्कृती झाली?
दुःख, अश्रू, मृत्यू
सगळं ज्यांना फक्त संधी वाटतं
प्रफुल पटेल, सुनील तटकरे
ते राजकारणी नाहीत, तर व्यावसायिक आहेत,
भावना शून्य, माणुसकी संपलेली नालायक लोक
नीच आणि कपटी राजकारणाचा निर्लज्ज खेळ खेळताय!
अशी स्थितील यांना कोणी बोलणार ही नाही,
माऊलीच्या वेदनेवर पाय देऊन
सत्तेचे हिशोब मांडले जातायत.
अजित दादा पाहत असतीलच
इतिहास लक्षात ठेवतो.
आणि कर्म कुणालाच चुकत नाही

शरद पवारांना अंधारात ठेऊन शपथविधी –

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी बद्दल शरद पवारांना विचारलं असता त्यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केलं. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते असून तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय करावं हे ठरवलं. त्यावर भाष्य करणार नाही,” असं शरद पवारांनी सांगितलं. अजित पवार पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतला. पक्ष त्यांचा आहे, त्यांच्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची प्रचीती दिसत आहे. आमचा मार्ग वेगळा आहे. परिवार हा साथ देण्यासाठी बाकी राजकारण वेगळं असं शरद पवार यांनी सांगितलं. म्हणजेच काय तर शरद पवारांना अंधारात ठेऊन शपथविधी घेण्यात आला हे स्पष्ट झालं.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading