Bachhu Kadu Melghat Yatra : पाईपलाईन असूनही पाणी नाही!! मेळघाटातील कुही गावात जाऊन बच्चू कडूंनी केली पोलखोल

Bachhu Kadu Melghat Yatra : गावात पाण्यासाठी पाईपलाईन आहे, पण पाणीच नाही अशी परिस्थिती झालीय मेळघाटातील कुही या गावात. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी कर्जमुक्तीची आठवण व मेळघाट संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुही गावातील नागरिकांशी संवाद साधून त्याठिकाणच्या आरोग्याच्या आणि पाण्याच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी पाण्यासाठी नागरिकांची होत असलेली वणवण पुन्हा एकदा अधोरेखित झाली आणि सरकारचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा निदर्शनास आला.

बच्चू कडू आज सोमवारी सकासकाळीच कुही गावात पोहचले. त्याठिकाणी काही महिला हापशी मारून पाणी भरत होत्या. त्यावेळी उन्हाळ्यात याठिकाणी पाणी असते का? ते किती काळ टिकत? या हापशी पासून घरापर्यंत पाणी न्यायला तुम्हाला किती वेळ लागतो असा प्रश्न बच्चू कडू यांनी महिला भगिनींना केला, त्यावर आम्हाला तर २-३ तास लागतात, पाण्याच्या २ घोटांसाठी आमची हि वणवण होतेय असं म्हणत महिलांनी आपली दुःखदायक कहाणी बच्चू कडूंना सांगितली. यावरून बच्चू कडू यांनी सरकारच्या कारभारावर निशाणा साधला. Bachhu Kadu Melghat Yatra

कुही गावात पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे, मात्र कनेक्शन नसल्याने पाणीच येत नाही. पाण्याला हि लाईन जोडलेलीच नाही. जर लाईन बसवली तर गावातील प्रत्येक घरात पाणी पोहोचू शकते. खरं तर पाण्याला लाईन जोडणे हे सोप्प काम आहे. कारण याठिकाणी पाणी आहे, लाईन आहे, पण कनेक्शन नाही, कारण सरकारची मानसिकता नाही. हे दुर्दवी असल्याचं बच्चू कडू यांनी म्हंटल.

आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे पाण्याअभावी जनावरे सुद्धा मृत पावल्याचे चित्र वेदनादायक आहे. पाण्याअभावी गायी मरत राहतात हे बरोबर नही. जर इथे माणसांना पाणी मिळत नसेल तर प्राण्यांना पाणी कसे मिळेल? ही खूप गंभीर बाब आहे. प्रशासन का जागे होत नाही हे मला समजत नाही. कडक उन्हात शेतकऱ्यांना इतके त्रास सहन करावे लागतात. एकीकडे गोहत्या बंदी आहे, पण गायींना पाणी मिळत नाही. गायीला पाणी देण्याची कोणतीही व्यवस्था नाही. आपण, गायीचे भक्त, गायीला वाचवण्याबद्दल बोलतो, मग आपण पाणी का देत नाही? असा सवाल करत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading