Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामतीत विमानाचे लँडिंग होण्यापूर्वीच विमान कोसळले आणि मोठा स्फोट झाला. या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार यांच्या अपघातांवर पहिल्यापासूनच संशय घेतला जातोय. अजित पवारांचा अपघात हा घातपात तर नाही ना? असा सवाल केला जातोय. त्यातच समोर आलेल्या सीसीटीव्ही नुसार, अजित पवार यांचे विमान धावपट्टीवर लँड होण्यापूर्वीच खाली कोसळताना दिसतंय. त्यामुळे विमानात आधीच काहीतरी तांत्रिक बिघाड तर नव्हता ना? अशाही चर्चा सुरु झाल्या. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनावणे यांनी धक्कादायक विधान करत खळबळ उडवून दिली आहे. अजितदादांच्या विमानात बॉम्ब तर नव्हता ना? असे बजरंग सोनावणे यांनी म्हंटल आहे.
काय म्हणाले बजरंग सोनावणे ? Ajit Pawar Plane Crash
प्रसारमाध्यमांशी बोलताना बजरंग सोनावणे म्हणाले, अजितदादांची सकाळी उठल्यापासूनची प्रक्रिया झाली. दादांची जी मोमेंट झाली ती मोमेंट सगळी आली पाहिजे. आता सर्व घटनाक्रम जर विचार केला तर तिथं कोण म्हणते की स्फोट झाला. तुम्ही जरी ८ वाजून ४६ मिनिटांच्या फुटेज मध्ये काय दिसतंय ते बघा? विमान जमिनीला टच होऊन क्रॅश नाही झाले. ते हवेत क्रॉस झालं, टील्ड झालं ठीक आहे. पण जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले आहे. ब्लास्टमध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे, तिथले लोक उडलेत बाहेर. त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला आहे. त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतो. म्हणजे मग ही घटना काय असू शकते याचा संशय नाही का? का त्याच्यात बॉम्ब होता? खाली न टच होता का इंजिन असं ब्लास्ट झालं? असा सवाल बजरंग सोनावणे यांनी केला. Ajit Pawar Plane Crash
दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. प्राथमिक अहवालात विमानातील तांत्रिक बिघाड आणि वैमानिकाचा चुकलेला अंदाज ही दोन प्रमुख कारणे असल्याचे समोर येत आहे. विमान लँडिंगच्या स्थितीत असताना त्याच्या नियंत्रण सिस्टीम मध्ये किंवा इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या बिघाडामुळे शेवटच्या क्षणी विमानाने संतुलन गमावले. इंजिनमधील बिघाडामुळे वैमानिकाला विमानावर नियंत्रण मिळवता आले नसल्याचं बोललं जात आहे. धावपट्टीच्या दिशेने जात असताना विमानात निर्माण झालेली अस्थिरता अपघाताचे कारण ठरले.
वैमानिकाचा अंदाज चुकला –
वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज आला नाही. तांत्रिक अडचणींमुळे विमान उतरवत असताना अँगल’ चुकला. पहिल्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे न उतरल्याने ‘वैमानिकाने पुन्हा एक राऊंड मारून दुसऱ्यांदा विमान उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, याच दरम्यान विमानाचे नियंत्रण तुटले आणि आणि ते खाली कोसळले असा अंदाज बांधला जात आहे. विमानाचे पायलट सुमित कपूर आणि को-पायलट शांभवी पायलट होते. कॅप्टन सुमित कपूर हे अनुभवी पायलट होते, मात्र तरीही मी विमान दुर्घटना घडली.