सत्तेसाठी शिंदेंचा थेट MIM ला फोन? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्तेसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. आजच्या राजकीय परिस्थितीत विचारधारेपेक्षा सत्ताकारणाला राजकीय नेतेंमंडळी महत्व देताना दिसतात. मागील काही वर्षात आपण अशी अनेक उदाहरणे बघितली आहेत. विकासाच्या नावावर कोण कोणत्या पक्षात जातोय हे तर उभा महाराष्ट्र दररोज बघतो असतोच. आता तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंशी फारकत घेतलेल्या एकनाथ शिंदेनी आपलाच महापौर बसावा यासाठी कट्टर विरोधक असलेल्या एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसीं ची मदत मागितल्याची धक्कादायक बातमी समोर येतेय. त्यामुळे एकनाथ शिंदेनी आता सत्तेसाठी हिंदुत्वाचा विचार सोडला कि काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कोणत्या महानगरपालिकेत शिंदेंना MIM ची गरज

आम्ही ज्या महापालिकेबाबत बोलतोय ती आहे मालेगाव महानगरपालिका … याठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन केल्याची माहिती एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी दिली आहे. सत्ता स्थापनेसाठी शिंदेंच्या शिवसेनेला संख्याबळाची गरज आहे. त्यामुळेच त्यांनी एमआयएमच्या नगरसेवकांचा पाठिंबा मागितला. मात्र एकनाथ शिंदेंची मागणी आम्ही फेटाळून लावली. सत्तेसाठी आम्ही कधीही भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणार नाही, असे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने मात्र जलील यांचा दावाच खोडून टाकला आहे. इम्तियाज जलील काय बोलतात याला महत्व नाही तसेच आमचा कोणताही प्रस्ताव MIM कडे गेलेला नाही असं शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं.

मालेगाव महानगरपालिकेत कशी आहेत राजकीय समीकरणे

मालेगाव महानगरपालिकेतील एकूण च्या एकूण 84 जागांपैकी ‘इस्लाम पार्टी या पक्षाला सर्वाधिक 35 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर एमआयएम 21, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 18, समाजवादी पार्टीने 5, काँग्रेस ३ आणि भाजपाने 2 जागा जिंकल्या आहेत. याठिकाणी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसल्याने सत्तास्थानपणेसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. शिंदेंच्या शिवसेनेचे 18 आणि एमआयएमचे 21 असे एकूण 39 नगरसेवक होतात. बहुमतासाठी आणखी चार नगरसेवकांची गरज त्यांना लागेल. त्यात भाजपाचे 2 आणि काँग्रेसचे 3 असे एकूण 44 नगरसेवकांची जुळवाजुळव शक्य असल्याचं बोललं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेनी MIM ला फोन केला असावा.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading