Maharashtra Municipal Corporation Reservation 2026 : महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर!! तुमच्या शहरात कोणाचा नंबर?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आज महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत जाहिर झाली आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते. महापालिकेतील सत्तेचे समीकरण निश्चित करण्यासाठी या सोडतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते.

कोणत्या शहरात कोणता महापौर

1 बृहन्मुंबई (BMC) खुला प्रवर्ग (ओपन) (महिला)
2 ठाणे अनुसूचित जाती (एससी)
3 कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमाती- एसटी (पुरुष)
4 नवी मुंबई खुला प्रवर्ग (ओपन)
5 वसई-विरार खुला प्रवर्ग (ओपन)
6 भिवंडी-निजामपूर
7 मीरा-भाईंदर खुला प्रवर्ग (ओपन)
8 उल्हासनगर ओबीसी
9 पुणे खुला प्रवर्ग (ओपन)
10 पिंपरी-चिंचवड खुला प्रवर्ग (ओपन)
11 नागपूर
12 अहिल्यानगर ओबीसी (महिला)
13 नाशिक खुला प्रवर्ग (ओपन)
14 छत्रपती संभाजीनगर खुला प्रवर्ग (ओपन)
15 अकोला ओबीसी (महिला)
16 अमरावती खुला प्रवर्ग (ओपन)
17 लातूर अनुसूचित जाती (एससी)
18 नांदेड-वाघाळा खुला प्रवर्ग (ओपन)
19 चंद्रपूर ओबीसी (महिला)
20 धुळे खुला प्रवर्ग (ओपन)
21 जळगाव ओबीसी (महिला)
22 मालेगाव खुला प्रवर्ग (ओपन)
23 कोल्हापूर ओबीसी
24 सांगली-मिरज-कुपवाड खुला प्रवर्ग (ओपन)
25 सोलापूर खुला प्रवर्ग (ओपन)
26 इचलकरंजी ओबीसी
27 जालना अनुसूचित जाती (एससी)
28 पनवेल ओबीसी
29 परभणी

कसे झाले वर्गीकरण –

सर्वसाधारण (खुला प्रवर्ग): १७ महापालिका
अनुसूचित जाती (SC) : 3 महापालिका
अनुसूचित जमाती (ST): 1 महापालिका (कल्याण-डोंबिवली)
इतर मागासवर्गीय (OBC): ८ महापालिका

या आरक्षण सोडतीमुळे राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधील सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. विशेषतः महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या प्रभागातील नियोजनात मोठे बदल करावे लागणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading