Kale ZP Election Result 2026 : काले जिल्हा परिषद गटात दयाभाऊंचीच जादू!! मनीषा पाटील यांचा दणदणीत विजय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काले जिल्हा परिषद गटात पुन्हा एकदा दयानंद पाटील यांची जादू पाहायला मिळाली. संपूर्ण भागाचे लक्ष्य लागलेल्या या निवडणुकीत दयानंद पाटील यांच्या पत्नी मनीषा दयानंद पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी पावणे यांचा दणदणीत पराभव केला. मनीषा पाटील यांच्या पराभवासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकत्रित आले होते. मात्र दयानंद पाटील यांचा करिष्मा आणि अचूक निवडणूक नियोजनाच्या जोरावर मनीषा पाटील या विरोधकांना पुरून उरल्या.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच मनिषा दयानंद पाटील या आघाडीवर होत्या… प्रत्येक फेरीत जशी जशी मतमोजणी होईल तसं तसं मनिषा पाटील यांची आघाडी वाढतच चाललं . त्यामुळं सुरुवातीपासूनच त्यांचा विजय हा स्पष्ट दिसत होता. दयानंद पाटील यांच्यावर प्रेम करणारी मंडळी आणि अतुल भोसले यांचे खंदे भाजप समर्थक मनिषा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अतिशय बारकाईने निवडणुकीत लक्ष घालण्यात आलं होते. एक एक मतासाठी डावपेच आखण्यात आले होते, त्या डावपेंचाना आणि यंत्रणांना यश आलं आणि मनिषा पाटील यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. विशेष म्हणजे यापूर्वी 2017 – 2018 च्या पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा मनिषा पाटील यांनी अशाच प्रकारे देदीप्यमान विजय मिळवला होता. आता त्यांनी थेट जिल्हा परिषदेत धडक मारली आहे.
दरम्यान, काले जिल्हा परिषद गट हा स्वर्गीय भीमरावदादा पाटील यांचा बालेकिल्ला…. दादा म्हणतील तेच धोरण आणि दादा म्हणतील तेच तोरण अस काले आणि पंचक्रोशीतील राजकारण आहे. मात्र सुमारे वर्षभरापूर्वी भीमराव दादांचे निधन झालं. परंतु दादांकडून राजकारणाचे बाळकडू शिकलेले त्यांचे सुपुत्र दयानंद पाटील आणि प्रकाश पाटीवल हे अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असल्याने जनतेशी त्यांची नाळ ही कायमची जुळलेली आहे. जनतेशी थेट जोडलेला माणूस, अडचणीत सर्वात आधी मदतीला धावून जाणारा माणूस अशी दयानंद पाटील यांची ओळख आहे. याच जनसेवेचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला….
मनिषा दयानंद पाटील यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. सर्वत्र गुलालाची उधळण दिसत आहे. एकच वादा, भीमराव दादा….. गावागावात एकच नाव, दयाभाऊ दयाभाऊ अशा जयघोषाने काले जिल्हा परिषद गट दुमदुमला आहे.









