हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज १०० वी जयंती. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी निमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येतेय. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलच्या आठवणी जाग्या केल्या जात आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) ट्विट करत बाळासाहेब ठाकरे याना अभिवादन केलं आहे. यावेळी मोदींनी मराठी भाषेतून ट्विट केल असून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे २ फोटोही अपलोड केलेत.
काय म्हणाले नरेंद्र मोदी ?
महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते. राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.
महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2026
दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली.
तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून… pic.twitter.com/3KFuZ8WPEk
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह मुंबईच्या रीगल सिनेमा समोरील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. रात्री १२ वाजता उद्धव ठाकरे त्याठिकाणी पोहचले, त्यांच्या सोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंसह पक्षाचे इतर बडे नेते सुद्धा उपस्थित होते. यंदा बाळासाहेब ठाकरे यांची जन्म शताब्दी आहे. त्यामुळे आजचा हा दिवस शिवसैनिकांसाठी महत्वाचा आहे.षण्मुखानंद हॉल मध्ये या खास दिनानिमित्त उद्धव ठाकरे व राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. या सोहळ्यात ठाकरे बंधू नेमकं काय बोलणार? शिवसैनिक आणि मनसैनिकांना काय सल्ला देणार त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे.