NCP Merger : पवारांनी निर्णय घेतला होता, पण दादांची इच्छा वेगळीच होती; विलीनीकरणाबाबत नवी माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन NCP Merger । अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाची चर्चा सातत्याने सुरु आहे. अजित पवार हयात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासाठी तब्बल १४ बैठका झाल्यास होत्या असं सातत्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून सांगण्यात येत आहे. अजित पवार यांच्यासोबत कधी आणि कोणकोणत्या तारखेला विलीनीकरणासंदर्भात बैठका झाल्या हे सुद्धा शरद पवार गटाकडून सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे अजितदादा आमच्याशी कधीही विलीनीकरणाबाबत बोलले नव्हे असं दादा गटातील नेत्यांकडून सांगितलं जात आहे. याच दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.

काय आहे नेमकी माहिती? NCP Merger

सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबत १६ जानेवारीला निर्णायक आणि महत्वाची बैठक पार पडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणानंतर पक्षाची सर्व सूत्रे आणि अधिकार अजित पवार यांच्याकडे जाणार होते. तर शरद पवार हे राजकारणातून अलिप्त होणार होते आणि सामाजिक कार्यात सक्रिय राहणार होते. परंतु अजित पवार यांची इच्छा होती कि शरद पवारांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जावं. शरद पवारांची राज्यसभेची टर्म एप्रिल महिन्यात संपणार असली तरीही त्यांनी पुन्हा राज्यसभेत जावं असं खुद्द अजित पवार यांनाच वाटत होते अशी माहिती आता समोर येत आहे. तर शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयंत पाटलांनाही अतिशय महत्वाची आणि मोठी जबाबदारी मिळणार होती असेही सूत्रांकडून समजत आहे. मात्र अजित पवारांच्या विमानाचा दुर्दैवी अपघात होऊन त्यांचं निधन झालं आणि विलीनीकरणाच्या सर्व चर्चाना मोठा ब्रेक लागला. NCP Merger

तटकरेंना होती विलीनीकरणाची कल्पना –

अजित पवार यांचे जवळचे अशी ओळख असलेल्या खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) याना या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची संपूर्ण कल्पना होती अशीही माहिती सूत्रांमार्फत समोर येत आहे. 16 जानेवारी 2026 रोजी तटकरे हे प्रेमकोर्ट या अजित पवार यांच्या निवासस्थानी गेले असता तिथं अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना भेटले देखील होते. याच बैठकीत अजितदादांनी तटकरे यांना विलिनीकरणाची कल्पना दिली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनील तटकरे सकारात्मक होते अशी माहिती आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading