PM Modi Call To Sharad Pawar : पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन; नेमकी काय चर्चा झाली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PM Modi Call To Sharad Pawar । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याना फोन करून तब्ब्येतीची विचारपूस केली.शरद पवार यांना काल खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यामुळे बारामती येथून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल केलं आहे, त्यापार्श्वभूमीवर मोदींनी तत्परतेने शरद पवारांना फोन लावला आणि त्यांची तब्ब्येत आता नेमकी कशी आहे याची माहिती घेतली. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, आज किंवा उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

काल अजित पवारांच्या तेराव्याच्या दिवशीच शरद पवार यांची प्रकृती बिघडली. शरद पवारांना खोकला आणि ताप आल्याने तातडीने बारामतीहून पुण्याला हलवण्यात आलं. पुण्यातील रुबी हॉल क्लीनिकमध्ये शरद पवारांवर उपचार सुरु झाले. बरदारीचा उपाय म्हणून शरद पवारांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. यावेळी त्यांच्या काही वैद्यकीय तपासण्या झाल्या होत्या. मात्र, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. आज नरेंद्र मोदींनी कॉल करून शरद पवारांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली . हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलनुसार शरद पवारांवर उपचार सुरू आहे आणि बारकाईने लक्षात ठेवण्यात येत आहे.

डॉक्टर अभिजीत लोढा यांनी सोमवारी रुग्णालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कालच शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली होती. डॉक्टरांच्या माहितीनुसार, शरद पवार याना कफ झाला आहे, तसेच शारीरिक थकवा आणि खोकल्याचा त्रासही जाणवत आहे. बाकी शरद पवार यांचे ब्लड प्रेशर, ऑक्सिजन लेव्हल, सॅच्यूरेशन सर्व काही नॉर्मल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील रिपोर्ट आल्यानंतर २-३ दिवसांत शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. शरद पवारांची प्रकृती बिघडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा काळजाचा ठोका चुकला होता, परंतु चिंता करण्याचे काहीही कारण नाही असं आता डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. तसेच कोणत्याही कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी हॉस्पिटलच्या आवारात गर्दी करू नये असा आवाहन रुग्णालयाकडून करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading