Praful Patel NCP Chief : प्रफुल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष; राजकीय विश्वात खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Praful Patel NCP Chief । राजकीय विश्वातुन एक सर्वात मोठी बातमी समोर येते आहे . अजित पवार यांच्या निधनानंतर खासदार प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होईल असं आपल्याला वाटत नसल्याचेही पियुष गोयल यांनी सांगितलं.

खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. त्यातच काल अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेते पदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील, किंवा दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होऊन पुन्हा एकदा शरद पवारांच्या हातात पक्षाची सूत्रे जाऊ शकतात असेही बोललं जात होते. मात्र त्यापूर्वीच पियुष गोयल यांनी मोठा बॉम्ब फोडत प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचे सांगितलं. Praful Patel NCP Chief

राज ठाकरेंचं विधान चर्चेत –

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य अध्यक्षपदावर भाष्य करताना म्हंटल होते कि,महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे. त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही. परंतु त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading