फालतू गरळ ओकण्यापेक्षा….; पवारांनी मुंब्य्रातील बापलेकींना सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंब्र्यामधील एमआयएमची तरुण नगरसेविका सहर शेख आणि तिचे वडील युनुस शेख हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. शनगरसेविका झाल्यानंतर सहर शेख आणि तिच्या वडिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर अक्षरशः खालच्या भाषेत टीका केली. युनूस शेख यांनी तर जितेंद्र आव्हाड यांचे नामकरण जुठा जितेंद्र असं करत तुतारीची मुतारी करुन टाका” अशी टीका केली. तसेच “जर तू प्रभाग क्रमांक 30 मध्ये कधी फिरताना दिसला तर मी तुला कुत्र्यासारखा मारेन. माझं डोकं फिरलं तर तुझी मुंब्र्यातली एंट्री बंद करुन टाकेन अशी धमकीच दिली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या मदतीला आला असून आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत मुंब्य्रातील बापलेकींना खडेबोल सुनावले आहेत.

काय म्हणाले रोहित पवार ?

सोशल मीडियावर ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड साहेब यांनी कायम शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा जपली, पण काही दिवसांपासून एमआयचा स्थानिक उमेदवार आणि त्याच्या नातेवाईकांकडून अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरली जाते. निवडून आलात म्हणजे हवेत जाऊन कशीही भाषा वापरण्याचा परवाना मिळत नाही. त्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं, असली खालच्या पातळीची भाषा कदापि खपवून घेतली जाणार नाही. मुळात निवडणूक लढण्यासाठी एमआयएमला फंडींग कुठून मिळतं आणि हा पक्ष कुणाची बी टीम म्हणून काम करतो, हे वेगळं सांगायला नको. निवडून आलात तर फालतू गरळ ओकण्यापेक्षा संबंधितांनी लोकांची कामं करावीत. आम्ही मात्र कायम आव्हाड यांच्यासोबत आहोत,”

दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि युनूस शेख हे मागील अनेक वर्षापासुन एकत्रच होते.परंतु महापालिका निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांनी सहर शेख यांची उमेदवारी नाकारल्यानंतर युनूस शेख आणि सहर शेख यांनी एमआयएम मध्ये प्रवेश केला आणि ते जिंकूनही आले. विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात सहर शेखने ‘कैसा हरया…’ असं म्हणत जितेंद्र आव्हाडांना डिवचले तसेच येणाऱ्या काळात आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची आहे. पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल तेव्हा आपल्याला संपूर्ण मुंब्रा शहर हे हिरव्या रंगाने रंगून टाकायचं आहे,’ असं विधानही केलं होते. जितेंद्र आव्हाड यांनी या एकूण सर्व प्रकरणावर अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a Comment

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading