हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death) यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राजकीय वर्तुळात हा खरंच अपघात होता कि यामागे काही घातपाताची शक्यता आहे? यावर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अजित पवारांचा पायलट ऐनवेळी का बदलण्यात आला? विमान जळून खाक झालं, मात्र विमानातील कागदे कशी काय जळाली नाहीत? अशा एक ना अनेक शंकांनी राजकीय घडामोडींचा चेव फुटला आहे. आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अप्रत्यक्षपणे घातपाताची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही खळबळजनक आरोप करत राजकीय वातावरण गरम केलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
आज सकासकाळी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, अजित पवार वारंवार सांगत होते की, माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी ती उघड करेन.15 जानेवारी रोजी ते भाजपच्या भ्रष्ट्राचारा बद्दल बोलले आणि पुढील दहा दिवसात त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. हे रहस्यमय आहे. मला जस्टीस लोया प्रकरणाची आठवण झाली. जर विमानात ६ प्रवाशी होते तर फक्त ५ मृतदेह कसे मिळाले? सहावी व्यक्ती कोण होती? त्याची बॉडी का मिळाली नाही? असा सवाल संजय राऊतांनी केला. एकीकडे सगळ्यांचे शरीर ओळखता येत नव्हते, मात्र त्याचवेळी अजितदादांच्या जवळ असलेले कागद जळालेले नाहीत. दादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? ते मुंबईतून फाईल बारामतीत सुरक्षित ठेवायला घेऊन चालले होते का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
अमोल मिटकरी यांचीही तीच शंका –
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही यापूर्वी हीच शंका उपस्थित केली होती. उपमुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी अपघाताचा इतिहास असलेल्या लियरजेट ४५ विमानाची निवड कोणी, कोणत्या निकषांवर केली?? विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, असं असताना प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? अपघातातील सहावी व्यक्ती कुठे गेली? टेक ऑफच्या आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग नंतर त्यात विसंगती कशी? स्फोटानंतर एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? सदर विमानाचे एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?” असे एक ना अनेक सवाल करत अमोल मिटकरी यांनी अप्रत्यक्षपणे घातपाताची शक्यता व्यक्त केली.