Sanjay Shirsat Accident : अजित पवारानंतर ‘या’ मंत्र्यांचा अपघात!! दोन्ही टायर फुटले अन….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sanjay Shirsat Accident । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची दुःखद घटना अजूनही ताजी असतानाच आता राज्यातील आणखी एका मंत्र्यांचा अपघात झाल्याची धक्कदायक माहिती समोर येतेय. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. खुद्द संजय शिरसाठ यांनीच याबाबत माहिती दिली आहे. मी थोडक्यात बचावलो नाहीतर मलाही श्रद्धांजली देण्याची वेळ आली होती असं म्हणत त्यांनी अपघाताचा थरार सांगितला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचे दौरे,बैठका आणि सभा सुरु आहेत. संजय शिरसाठ सुद्धा याची निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे सध्या प्रचार करत आहेत. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी अपघाताची खरीखुरी कथा सांगितली. शिरसाठ म्हणाले, माणसाचा काही भरवसा नाही. अजितदादा गेले की नाही? कुणाला वाटलं होतं का असं काही होईल? काल माझी ही बारी आली होती. काल माझ्या कारचा अपघात झाला. माझी गाडी एका खड्डयात आदळली आणि कारचे दोन्ही डावे टायर फुटले. थोडक्यात वाचलो, नाहीतर माझीही श्रद्धांजली वाहण्यात आली असती असं संजय शिरसाठ म्हणाले.

आजचा दिवस आजच जगा. आजचा दिवस आजच चांगला घालवा. उद्यावर अवलंबून राहू नका, उद्याच्या दिवसाची चिंता करू नका. असं कानमंत्रही त्यांनी उपस्थिताना दिला. मी किती मोठा झालो याला महत्त्व नाही. मी लोकांसाठी काय करतो हे महत्त्वाचं आहे. ते काम केलं पाहिजे असं ,मी मानतो. मला नेहमी वाटते कि आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांच्या आशीर्वादावर आपण जिवंत आहोत. तुमचा आशीर्वाद पाठिशी आहे, म्हणून आम्ही आहोत असे सांगायलाही संजय शिरसाठ हे विसरले नाहीत.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading