Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता; राष्ट्रवादी- शिवसेनेचे सदस्य फुटले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Satara ZP Election । निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटून गेला तरी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत कोणाची सत्ता येणार? सेनापती कोण होणार आणि कोणाचा गेम वाजणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागले होते. अखेर आज २० मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद आणि उपाध्यक्ष पदाची निवड पार पडली आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोठा राजकीय ट्विस्ट बघायला मिळाला. सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचीच सत्ता बसेल असं वाटत असतानाच भाजपने चमत्कार केला आणि सातारा जिल्हा परिषदेवर कमळ फुलवले. भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्ष झाल्या तर तर राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

खरं तर 65 सदस्यांच्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे सर्वाधिक 27 उमेदवार निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडे २० तर शिवसेनेकडे १५ सदस्यांचे संख्याबळ होते. त्यातच स्वाभिमानीच्या एका सदस्यानेही राष्ट्रवादीसोबतच गटनोंदणी केल्याने एकूण संख्याबळ हे ३६ झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने निवडणुकीपुर्वीच आघाडी केल्याने राष्ट्रवादी- शिवसेना यांच्या युतीची सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होणार असे अंदाज राजकीय विश्लेषक मांडत होते. मात्र अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या दिवशी भाजपने मोठा गेम फिरवला आणिराष्ट्रवादी- शिवसेनेला अस्मान दाखवलं.

राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना आघाडीने अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा फडतरे आणि उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अशोकराव पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून अध्यक्षपदासाठी कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आणि प्रिया शिंदे आणि उपाध्यक्षपदासाठी राजू भोसले यांना उमेदवारी दिली होती. मात्र आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी शिवसेना- राष्ट्रवादीचे ३ सदस्य अनुपस्थित राहिले. 32 जागांवर संख्याबळ दाखवत भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद ताब्यात घेतले, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना फक्त 31 सदस्यांचे संख्याबळ दाखवू शकले…अटीतटीच्या या लढाईत भाजपने एका जागेवर जिल्हा परिषदेतील सत्ता अक्षरशः खेचून आणली.

सातारा जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासुन बाजूला ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली खरी, शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी डाव टाकला होता खरा, परंतु मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांना फोडत ऑपरेशन लोटस यशस्वी करून दाखवले आहे आणि सातारा जिल्हा परिषदेत चमत्कार घडवून दाखवला.

Leave a Comment

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading