हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sharad Pawar Health Update । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जेष्ठ नेते शरद पवार याना ९ फेब्रुवारीला पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये भरती करण्यात आलं होते. शरद पवार याना खोकल्याचा त्रास आणि ताप आल्याने तातडीने बारामतीहून पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जीव चांगलाच भांड्यात पडला होता. मात्र आता शरद पवार यांची प्रकृती अतिशय उत्तम असून आजच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी ही गुडन्यूज दिली आहे शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून ते बरे झाले आहेत असं डॉक्टरांनी सांगितले. तसेच त्यांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांना आज देण्यात डिस्चार्ज येणार आहे. ते म्हणाले, आज आम्हाला आनंद झाला आहे. शरद पवार साहेबांची तब्येत चांगली असून ते आज घरी जाणार आहेत. छोटसं छातीचं इन्फेक्शन झालं होतं. परंतु आता शरद पवार पूर्ण चांगले झाले आहेत. एक तासाने शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिक मधून सोडण्यात येणार आहे. शरद पवार घरी जाऊन आराम करतील. कमीत कमी ४ ते ५ दिवस त्यांना घरीच आराम करावा लागेल. त्यानंतर ते पुण्यामध्ये नंतर बाहेर जाऊ शकतात .
दरम्यान, शरद पवारांना रुग्णालयात दाखल करताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्परतेने शरद पवारांना फोन कॉल लावला आणि त्यांची तब्ब्येत आता नेमकी कशी आहे याची माहिती घेतली होती. जिल्हा परिषद निवडणूक निकालाच्या दिवशीच शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली होती . शरद पवारांना खोकला आणि ताप आल्याने तातडीने बारामतीहून पुण्याला हलवण्यात आलं. पुण्यातील रुबी हॉल क्लीनिकमध्ये शरद पवारांवर उपचार सुरु झाले. खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवारांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. यावेळी रुग्णसेवेत अडथळा येऊ नये यासाठी पवार यांच्या कार्यकर्त्यांनी परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले होते.
शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत प्रकृतीबद्दल अपडेट दिली होती. एक पोस्ट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या कि, बाबांना छातीत संसर्ग झाला असून त्यांना 5 दिवसांच्या अँटीबायोटिक्सचा कोर्सपूर्ण करावा लागणार आहे. सुदैवाने, इतर सर्व शारीरिक रिपोर्ट्स सामान्य आले आहेत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.