Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sharad Pawar Health Update । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती अचानक खालावल्याने ३ दिवसांपूर्वी त्यांना बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल करण्यात आलं होते. शरद पवार याना खोकला आणि तापाचा त्रास जाणवू लागला होता. त्यावेळी काही वैद्यकीय तपासण्या झाल्या होत्या. यानंतर शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही, असा निर्वाळा डॉक्टरांनी दिला होता. आता शरद पवारांच्या प्रकृतीबाबत रुबी हॉल क्लिनिककडून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टरानी सांगितलं कि, शरद पवार साहेबांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. आपण त्यांना अँटीबायोटिक्स देत आहात, देत आहोत. त्यांची फिजिओथेरपी स्टार्ट केलेली आहे. त्यांना आपण अजून एक दोन दिवस अँटीबायोटिक साठी फक्त ठेवणार आहे. बाकी त्यांचे सगळे पॅरामीटर्स वगैरे सगळे बऱ्याच सुधारणा झाली आहे. रुटीन तपासण्यांमध्ये असं आलं आहे की थोडसं इन्फेक्शन झालं होतं आणि ते अँटीबायोटिक्सने आता बराच सुधारणा झालेली आहे. स्ट्रेसमुळे आणि लोकांच्या संपर्कात आल्यामुळे थोडसं इन्फेक्शन झालं होतं. आता त्यांना काहीही त्रास होत नाहीत, साहेब ऑलमोस्ट बॅक टू नॉर्मल आहेत. एक ते दोन दिवसात शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्परतेने शरद पवारांना फोन काल लावला आणि त्यांची तब्ब्येत आता नेमकी कशी आहे याची माहिती घेतली. अजित पवारांच्या तेराव्याच्या दिवशीच शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती . शरद पवारांना खोकला आणि ताप आल्याने तातडीने बारामतीहून पुण्याला हलवण्यात आलं. पुण्यातील रुबी हॉल क्लीनिकमध्ये शरद पवारांवर उपचार सुरु झाले. खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवारांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. यावेळी त्यांच्या काही वैद्यकीय तपासण्या झाल्या होत्या. मात्र, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. आता लवकरच शरद पवारांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं डॉक्टरानी सांगितल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading