शरद पवारांची अजितदादांच्या दोन्ही लोकांसोबत चर्चा; विलीनीकरण की आणखी काही?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चाना उधाण आलं असताना आज शरद पवार (Sharad Pawar) यांची अजित पवारांचे दोन्ही सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार (Parth Pawar And Jay Pawar) यांच्यासर्पब्त बैठक सुरु आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर महत्त्वाच्या संस्थांमधील पदांची वाटणी पवार कुटुंबात वाटणी केली जाणार असल्याचं बोललं जातंय. त्याच पार्श्वभूमीवर हि बैठक आयोजित करण्यात आली आहे.

अजितदादा अनेक संस्था, संघटनांचे पदाधिकारी होते. माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे संचालक, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष, विद्या प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त यासारखी पदं अजित पवार सांभाळत होते. अजित पवारांच्या निधनानंतर या पदांवर आता त्यांच्याच घरातील कोणत्या तरी सदस्यांची वर्णी लागेल. यामध्ये पार्थ आणि जयचे नाव आघाडीवर आहे. अजित पवार यांच्या जागी विश्वस्त म्हणून पार्थ किंवा जय पवार यांना घेण्यात येणार आहे तर अजित पवार यांच्या स्मारकाबाबत चर्चा झाल्याचे बोललं जातंय. शरद पवार, पार्थ पवार जय पवार आणि विद्या प्रतिष्ठान विश्वस्त मंडळाची ही बैठक काहीवेळापूर्वी संपली आहे, मात्र या विश्वस्त मंडळाच्या बैठकीनंतर आजोबा आणि नातवांची ही खासगी बैठक सुरू झाल्याने चर्चाना आणखी उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार का?

दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार का? हा कळीचा मुद्दा आहे. अजित पवारांचीच इच्छा होती कि दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्या, त्यादृष्टीने आमच्या काही बैठकही झाल्या असल्याचा दावा शरद पवारांनी केला होता. मात्र दुसरीकडे या बैठका फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपुरत्या मर्यादित होत्या असं म्हणत अजितदादा गटातील नेते विलीनीकरणाला विरोध करताना दिसत आहेत. सध्या तरी दादा गटाची संपूर्ण सूत्रे हि सुनेत्रा पवार यांच्या हातात आहेत. त्यामुळे आगामी काळात सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका घेतात? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक होतील का? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading