Shivsena Thackeray Vs Shinde : शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्ष (Shivsena Party) आणि चिन्ह नेमका कोणाचा? उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) कि एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अंतिम सुनावणी पार पडणार होती. मात्र राज्याच्या या हाय वोल्टेज सत्तासंघर्षची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता २३ जानेवारी म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी याबाबतची सुनावणी होणार आहे. त्यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद नेमका कोणाला मिळतोय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असेल.

एकनाथ शिंदे यांनी २०२२ साली बंड केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंकडून शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंना दिले होते. आयोगाचा हा निर्णय प्रामुख्याने विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारावर घेतल्याचे मानले जाते. धनुष्यबाण चिन्हाचा एकनाथ शिंदेंना निवडणुकीत मोठा फायदा झाला. यानंतर त्याविरोधात ठाकरे गटाचे आमदार आणि याचिकाकर्ते सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होते. न्यायालयाने या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे 21 आणि 22 जानेवारी हे दोन दिवस केवळ याच सुनावणीसाठी राखून ठेवले होते. मात्र सकाळपासूनच अशी चर्चा सुरु होती कि आजची सुनावणी होणार नाही, कारण सुनावणीचा क्रमांक ३७ होता. अखेर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ २३ जानेवारी रोजी सुनावणी घेईल.

हि सुनावणी फक्त कोणत्या पक्षाची सुनावणी नाही तर भारतीय लोकशाहीला दिशा देणारी सुनावणी आहे. हा वाद फक्त निवडणूक चिन्हा आणि पक्षाच्या नावा पुरता मर्यादित नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा खरा राजकीय वारसदार कोण ? शिवसेनेसारखी तळागाळात कष्ट करून उभी राहिलेली संघटना कोणाच्या हातात जाणार याचा निकाल ठरवणारी हि सुनावणी असेल. एकीकडे बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच त्यांनी शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरेंकडे दिली होती. तर दुसरीकडे शिंदे गटाचे म्हणणे आहे कि पक्षातील सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा आम्हाला आहे. अशावेळी या केसचा निकाल देणं हे सुद्धा सरन्यायाधिशांसमोर मोठं आव्हान असेल.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading