NCP : राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? घडामोडींना वेग
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची चर्चा मागील काही दिवसापासून सुरु आहे. सुरुवातील प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेससारख्या रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा पाटील असावा पण पटेल नसावा असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं. प्रफुल्ल पटेल यांच्या नावाला विरोध असल्याचं चित्र दिसलं, यानंतर स्वता प्रफुल पटेल याना पत्रकार परिषद घेत मी अध्यक्ष होणार नाही असं सांगावं लागलं. यानंतर आता आणखी एक बातमी समोर येतेय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित होणार असल्याचं बोललं जातंय.
सुनेत्रा पवार यांचीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात यावी असा पक्षातील आमदारांचा सूर आहे. पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही ही मागणी उचलून धरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पक्षातील 30 पेक्षा जास्त प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडण्यात यावे अशी मागणी केली आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना हे पत्र पाठवण्यात आलं आहे.
विलीनीकरणाचे काय?
दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार का? हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे. अजित पवारांचीच इच्छा होती कि दोन्ही पक्ष एक व्हावेत असं खुद्द शरद पवार आणि त्यांच्या पक्षातील प्रमुख नेते सांगत आहेत, याबाबत आमच्यात १४ बैठकाही झाल्याचे शरद पवार गटाकडून सांगण्यात येतेय. मात्र दुसरीकडे अजितदादा आम्हाला विलीनीकरणाबाबत काहीच बोलले नाहीत असं दादा गटातील नेते म्हंटल आहेत. शरद पवारांनी काल अजित पवारांचे दोन्ही सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर रात्री सुनेत्रा पवार यांच्यासोबतही शरद पवारांची बैठक पार पडली. या बैठकीत नेमकं काय घडलं हे अजून समोर आलेलं नाही. परंतु दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार का? याकडे सर्वांचं लक्ष्य आहे.









