Supriya Sule Daughter Revati Sule Marriage : सुप्रिया सुळेंच्या लेकीचं लग्न ठरलं!! फडणवीसांच्या मध्यस्थीने सोयरीक? जावई कोण बघाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Supriya Sule Daughter Revati Sule Marriage। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचे लग्न ठरलं आहे. सारंग अरुण लखानी (Sarang Lakhani) यांच्यासोबत रेवती सुळेंचं लग्न ठरलं आहे. सारंग लखानी हे मूळचे नागपूरचे आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंची मुलगी आता नागपूरची सून होणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने हि सोयरीक जुळली असल्याचं बोललं जात आहे.

सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियात पोस्ट शेअर करत रेवती सुळे यांच्या लग्नाची गोड़ बातमी दिली आहे. या पोस्टमध्ये स्मृती शिंदे यांनी सुप्रिया सुळे आणि सारंग लखाणी यांचा फोटो शेअर करत खाली कॅप्शन मध्ये लिहलं कि रेवती सुळे, सारंग लखानी आणि दोन्ही परिवाराचे अभिनंदन…. परंतु हे लग्न नेमकं कोणत्या दिवशी होणार आहे याबाबतची मात्र कोणतीही अपडेट अजून समोर आलेली नाही.

कोण आहेत सारंग लखानी ?

सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग हे एक चांगले बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे. तर दुसरीकडे रेवती सुळे यांनी प्रतिष्ठित London School of Economics मधून पदवी पूर्ण केली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत प्रथमच प्रचारात सहभाग घेतला होता. मात्र सक्रिय राजकारणात त्या अजून तरी आलेल्या नाहीत.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading