Summer Special Trains : मुंबई- पुण्यावरून नागपूरसाठी विशेष ट्रेन; पहा वेळापत्रक आणि थांबे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Summer Special Trains सध्या उन्हाळा सुरु असून याकाळात शाळांना सुट्ट्या असतात. त्यामुळे साहजिकच मुंबई- पुण्यासारख्या मोठ्या शहरात नोकरीनिमित्त गेलेले कर्मचारी आपल्या मूळगावी जात असतात. परिणामी रेल्वे प्रवाशांवर मोठा ताण पडतो. लोकांना गर्दीतूनच आणि वेळप्रसंगी उभं राहून प्रवास करावा लागतो. अशावेळी प्रवाशांना आरामात रेल्वे प्रवास करत यावा तसेच त्यांना गर्दीला सामोरं जावं लागू नये यासाठी रेल्वे विभागाने मुंबई आणि पुण्याहून नागपूरसाठी काही विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस–नागपूर आणि पुणे–नागपूर या दोन महत्त्वाच्या मार्गांवर या विशेष गाड्या धावणार आहेत.
यातील लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर विशेष गाडीच्या २ सेवा होतील. गाडी क्रमांक ०१०२१ हि ०३ एप्रिल २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.५५ वाजता सुटेल आणि| नागपूर येथे त्याच दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१०२२ विशेष गाडी दिनांक ०३ एप्रिल २०२६ रोजी नागपूर येथून २०.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल. Summer Special Trains
हि स्पेशल ट्रेन (Summer Special Trains) ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा रेल्वे स्थानकावर थांबेल. तिच्या रचनेबद्दल सांगायचं झाल्यास, एक वातानुकूलित द्वितीय, सहा वातानुकूलित तृतीय, नऊ शयनयान, चार सामान्य द्वितीय आणि एक सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना राहणार आहे.
यानंतर पुणे–नागपूर मार्गावर सुद्धा एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार, गाडी क्रमांक ०१४६७ विशेष ०३ एप्रिल २०२६ रोजी पुणे येथून १५.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४६८ विशेष गाडी दिनांक ०४.०४.२०२६ रोजी नागपूर येथून ०८.०० वाजता सुटेल आणि पुणे रेल्वे स्थानकावर येथे त्याच दिवशी २३.३० वाजता पोहोचेल.
या ट्रेनला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. तिच्या रचनेबद्दल सांगायचं झाल्यास, यामध्ये दोन वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, आठ शयनयान, चार सामान्य द्वितीय आणि एक सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना राहणार आहे.










