WhatsApp Features

WhatsApp Features : आता 15 मिनिटांत मेसेज गायब होणार; WhatsApp चे भन्नाट फीचर्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।WhatsApp Features | WhatsApp हे सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. अँड्रॉइड मोबाईल आहे पण व्हाट्सअप वापरत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. व्हाट्सअपच्या माध्यमातून आपण आपल्या ओळखीच्या लोकांशी मेसेजवर बोलू शकतो. एकमेकांना विडिओ, फोटो, फाईल्स पाठवू शकतो. व्हाट्सअप मुळे आपली अनेक कामे सोप्पी झाली आहेत. कंपनी सुद्धा व्हाट्सअपमध्ये नवनवीन फीचर्स आणत असते जेणेकरून यूज़र्सचा अनुभव आणखी चांगला होईल. आताही व्हाट्सअप असच एक फीचर्स लाँच करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला केलेला मेसेज १५ मिनिटात गायब होऊ शकतो. हे फीचर विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी फायदेशीर ठरेल ज्यांना त्यांचे खाजगी संभाषण अधिक सुरक्षित ठेवायचे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या नवीन फीचरचे (WhatsApp Features)  नाव ‘आफ्टर रीडिंग’ आहे. याचा अर्थ असा की, समोरच्या व्यक्तीने तुमचा मेसेज वाचताच, तो एका ठराविक कालावधीनंतर आपोआप डिलीट होईल. सध्या व्हाट्सअप मध्ये २४ तास, ७ दिवस किंवा ९० दिवसांनंतर मेसेज आपोआप डिलीट होतात परंतु नवीन अपडेट नंतर फक्त १५ मिनिटातच हे मेसेज डिलीट होतील. तसेच जर मेसेज उघडला नाही, तर तो २४ तासांच्या आत आपोआप डिलीट होऊ शकतो. विशेष म्हणजे, तुम्ही ‘रीड रिसिप्ट्स’ (निळ्या टिक) बंद केल्या असल्या तरीही हे फीचर काम करते.

जेव्हा तुम्हाला कोणालातरी तात्पुरती माहिती पाठवण्याची गरज असते, तेव्हा हे फीचर (WhatsApp Features) अत्यंत उपयुक्त ठरू शकते. उदाहरणार्थ, ओटीपी, पासवर्ड किंवा वैयक्तिक डिटेल्स पाठवण्याच्या वेळी या फीचर्सचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल. या नव्या फीचर्समुळे मोबाईलमध्ये जास्त स्टोरेज सुद्धा राहणार नाही, आणि महत्वाची बाब म्हणजे तुमचा डेटाही लीक होण्याची शक्यता नाही. सध्या, कंपनीकडून या फीचर्सचे टेस्टिंग सुरु आहे. यूजर्ससाठी ते कधी रोल आऊट करण्यात येईल याची तारीख कंपनीने अजून तरी सांगितलेली नाही

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading