Sunetra Pawar : अजितदादांच्या खुर्चीत बसताच सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्रातील जनतेला मोठा शब्द
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sunetra Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रेही त्यांनी हाती घेतली आहेत. आज प्रथमच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा पार्थ पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवारांच्या खुर्चीत बसणे हा खरं तर सुनेत्रा पवार यांच्यासाठी भावनिक क्षण होता. मात्र जनसेवेचा वसा पुढे ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार आता कामाला लागल्यात. अजितदादांच्या खुर्चीत बसताच सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला मोठा शब्द दिला आहे.
काय म्हणाल्या सुनेत्रा पवार? Sunetra Pawar
सुनेत्रा पवार यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवरून पोस्ट शेअर करत म्हंटल कि, आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल.
आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 10, 2026
दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि… pic.twitter.com/5Tc2PsfDQ9
दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिली.
दरम्यान, मंत्रालयात पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि अदिती तटकरे यांसारख्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेतली आणि पक्षाच्या आगामी आगामी रणनीतीवर चर्चा केली. आज सुनेत्रा पवार या त्यांच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीला उपस्थिती राहिल्या. सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क आणि क्रीडा खाते असून त्या खात्याबाबत आज काही निर्णय होतो का ते बघावं लागेल.









