Maharashtra Rain

Weather Update : राज्यात आज पावसाचा इशारा!! या जिल्ह्यांना येलो अलर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे महाराष्ट्रातून थंडी हळू हळू नाहीशी होत असून उन्हाळ्याची आतुरता सर्वाना आहे. मात्र याच दरम्यान, आज आणि उद्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता (Maharashtra Rain) वर्तवण्यात आली आहे. विदर्भात हा पाऊस कोसळेल. तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे पुढील काही दिवसात थंडी कमीच राहील.

मागील दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची स्थिती पाहायला मिळतेय. अशा परिस्थितीत आता पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून, किमान तापमानातही हळूहळू वाढ होताना दिसत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सोमवारी म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपात वरुणराजाचे दर्शन होईल. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दुसरीकडे, नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज सोमवार आणि उद्या मंगळवार या २ दिवसांत पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम यासह काही जिल्हात पावसाची शक्यता आहे. सध्या विदर्भातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. उत्तरेकडून पश्चिम दिशेला पश्चिमी झंझावात गेल्यानं परिणाम स्वरूप विदर्भात ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली आहे. मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागांत हवामान कोरडे राहील. पुणे शहरात सकाळी थंडीचा कडाका सोसावा लागतोय तर यानंतर दिवसभर आकाश मुख्यतः स्वच्छ राहील. येथे कमाल तापमान 30 अंश, तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading