NCP Merge : सुनेत्रा पवारांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतल्यास आम्हांला….; राष्ट्रवादी आमदाराच्या विधानाने खळबळ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death) यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चाना वेग आला आहे. अजित पवार यांचीच इच्छा होती केली दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात असं खुद्द शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांकडून सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे दादा गटाचे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मात्र आम्हाला अजितदादांनी विलीनीकरणाबाबत काहीच सांगितलं नव्हतं असं म्हणत हात वर केले. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण अडचणीत आहे कि काय अशा चर्चा सुरु झाल्या. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ ( Hasan Mushriff) यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले हसन मुश्रीफ ?
प्रसारमाध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलनीकरणाबाबत अजित पवारांच्या पातळीवर काही चर्चा सुरु असतील तर त्याची आम्हाला माहिती नाही. मात्र पवार कुटुंब आणि विशेषत: सुनेत्रा पवार यांची विलीनीकरणाबाबत भूमिका काय आहे, यावरच त्यासंदर्भातील अंतिम निर्णय अवलंबून असेल. सुनेत्रा पवारांनी (Sunetra Pawar) जर विलीनीकरणासंदर्भात निर्णय घेतला तर तो आम्हाला मान्य करावाच लागेल. असं सूचक विधान केलं हसन मुश्रीफ यांनी केलं आहे
खरं तर सुनेत्रा पवार यांनी तातडीने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने आणि विधिमंडळ पक्षनेतेपद ताब्यात घेतल्याने अजित पवारानंतर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य नेत्या असणार हे स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुद्धा सुनेत्रा पवार यांचीच निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे पक्षाचे सर्वच अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या विधानाला मोठं महत्व आहे. मागील काही दिवसांत पवार कुटुंब एकत्र दिसले आहे. स्वतः शरद पवार हे पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा करताना ,महाराष्ट्राने बघितलं आहे. त्यामुळे आगामी काळात लवकरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, एक होतील असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.









